belgaum

अन्न नागरी खात्याच्या अडवल्या ट्रक

0
389
Truck food dept
 belgaum

कुट्टलवाडी ते बामणवाडीचा रस्ता रेशन वाहून नेणाऱ्या ट्रकनी खराब केल्याने संतप्त बामणवाडी ग्रामस्थांनी माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वात ट्रक अडवल्या होत्या. अन्न नागरी खात्याच्या गाड्या तीन तास हुन अधिक काळ अडवल्या व आंदोलन केले.

कुट्टलवाडी रस्ता दीड दीड फूट खड्डे पडले आहेत बामणवाडीचा रस्ता खराब झाला आहे जर का प्रशासनाने हा रस्ता त्वरित दुरुस्त केला नाही तर पुढील आठवड्यात पिरनवाडी जवळ रस्ता रोको करू असा इशारा देण्यात आला आहे.

बामनवाडी येथे अन्न नागरी खात्याचे गोडावन आहे दर आठवड्यातून शेकडो ट्रक इथे ये जा करत असतात त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा पुढील वेळी मुख्य रस्त्यावर ट्रक अडवून रस्ता रोको करू असा इशारा माजी महापौर विजय मोरे यांनी दिलाय.दुपारी एक ते चार पर्यंत या काळात 50 हुन अधिक ट्रक अडवल्या होत्या. अन्न नागरी खात्याकडून ठोस आश्वासन मिळे पर्यंत ट्रक अडवून ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.