बेळगाव जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर अनेक जण बेघर झाले आहेत. अशा अवस्थेत प्रशासनाने मदत करावी याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र प्रत्यक्षात सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी अवस्था निर्माण झाली आहे. अजूनही पूरग्रस्तांना योग्य ती मदत मिळाली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डोळ्यादेखत पुरामुळे होत्याचे नव्हते झाले. पूरग्रस्त मदतीकरिता शासनाकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. मात्र अद्यापही अनेक हजारो लोकांना पूरग्रस्तांच्या परिस्थितीत पुरता संसार वाहून गेला असला तरी प्रशासनाच्या निधीकडे मात्र लक्ष लागून राहिले आहे. प्रशासन मात्र संबंधितांना मदत करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारी लाभ तरी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील कोट्यवधीचे नुकसान झाले आहे ते कडू जनावरे लोकांच्या डोळ्यासमोर वाहून गेले आहेत. बेळगाव शहरातील इतर परिसरात मोठ्या प्रमाणात पुर आला आहे. विशेष करून कृष्णा नदीच्या काठावर आलेल्या नागरिकांना त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. मात्र तरीदेखील अजूनही एकूण हजारो कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची गरज असताना प्रशासन मात्र आता हात वर करू लागले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे अवस्था काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
केवळ पाच दहा हजार रुपये मदत देऊन आपले कार्य संपले असे प्रशासनाला वाटत आहे. मात्र पूर्व उतरल्यानंतर पडझड झालेल्या घरांची देखील तातडीने सर्वेक्षण करण्याची गरज असताना याकडे साफ दुर्लक्ष करून प्रशासनाने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. काही ठिकाणी तात्पुरता स्वरुपात स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यात आले होते. पाऊस कमी झाल्यानंतर सर्व पूरग्रस्तांना आपापल्या घरी गेले पण आजही परतीच्या पावसाने झोडपल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्याकडेही आता प्रशासनाने दुर्लक्ष केले असून याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.