दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी निवांतपणासाठी रात्री दारूच्या आहारी जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व्यसनाधिन होत असून युवापिढी ही यामध्ये गुरफटत आहे. अशा परिस्थितीत सरकारने याचा गंभीरपणे विचार करून दारू बंद करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात सध्या युवा पिढी मोठ्या प्रमाणात दारूचा व्यसनात गुरफटत आहे. याच बरोबर इतर व्यसनही करत आहे. यामुळे मोठा धोका उद्भवत आहे. काही वेळा तर मारामारी शिविगाळ असे प्रकार घडत आहेत. अशा परिस्थितीत दारू दुकान सुरू ठेवून एक प्रकारे अन्यायच करण्यात येत आहे. त्यामुळे मद्याची दुकाने बंद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील दारू दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत. केंद्राच्या नवीन नियमानुसार काही दारू दुकाने बंद झाली असली तरी आता पुन्हा ती सुरू करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. त्यामुळे अशा दारू दुकानकडे परवाना देऊ नये. ती दुकानेही बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूचा विळखा वाढला आहे. अनेक शेतकरी व्यसनाधीन होत असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या परिस्थितीत राज्यातील सर्व दारू दुकाने बंद ठेवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. शेतकरी नेते सिद्धगोंड पाटील,वकील नामदेव मोरे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव कागनीकर आदींनी काही काळ घोषणाबाजी करत डी सी ऑफिस समोर ठिय्या केलं होतं.