Friday, April 26, 2024

/

माजी नगरसेवक पुत्राची हॉटेल कर्मचाऱ्यांवर दादागिरी

 belgaum

हॉटेलमधील वेटरने पाणी आणण्यास उशीर केल्यामुळे चार ग्राहकांनी मिळून वेटरला मारहाण केल्याची घटना शहरातील डोंने बिर्याणी या रामदेव भागातील हॉटेलमध्ये घडली आहे. माजी नगरसेविका जयश्री माळगी यांचा पुत्र अशोक कुमार यांनी  तिघा सहकाऱ्यासह ही मारहाण केली आहे.

पाणी आणण्यास वेळ झाला म्हणून नगरसेविकेच्या सुपुत्रासह अन्य तिघांनी हाताला येईल ते घेऊन वेटरला मारहाण केली.हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर ए पी एम सी पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवून घेतली आहे.

सुरुवातीला या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आलेली नव्हती प्रकरण अंगलट येण्याची खात्री झाल्यामुळे मारहाण केलेल्यानी आटापिटा करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी सुरुवातीला प्रकरण दाखल करून घेतले नव्हते तक्रार द्यायला गेलेल्या वेटर ला परत पाठवले होते अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात लक्ष दिल्याने प्रकरण नोंद झाले आहे. नगरसेविच्या पुत्राची मारामारी सीसीटीव्ही कैद झाली होती व्हायरल देखील झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.