मराठा मंडळचे नाथाजीरव हलगेकर डेंटल कॉलेजला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून दि.१३ ऑक्टोबर रोजी रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.डेंटल कॉलेजच्या आवारात रविवार दि.१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे.
रौप्य महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या सेंट्रल रिसर्च लॅबोरेटरी,मेडीसीनल गार्डन, औषधी मूल्यमापन विभागाचे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन डायरेक्टर रमानन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.पद्मभूषण ब्रिगेडियर डॉ.अनिल कोहली यांच्या हस्ते औषधी मूल्यमापन विभागाचे उदघाटन होणार आहे.पद्मश्री डॉ.महेश वर्मा हे रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे उदघाटन आणि स्मरणिका प्रकाशन करणार आहेत.आमदार डॉ.भरत शेट्टी यांच्या हस्ते मेडीसीनल गार्डनचे उदघाटन होणार आहे.राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचे उप कुलगुरू डॉ.एस.सच्चीदानंद हे विशेष मुलांच्या शाळेचे उदघाटन करणार आहेत.मेड टेक झोनचे सी ई ओ किंगशुक पोद्दार यांच्या हस्ते औषधी प्रयोगशाळेचे उदघाटन होणार आहे.
पत्रकार परिषदेला डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमाकांत नायक,रौप्य महोत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ.मधु पुजार ,नागराजू,डॉ.किशोर भट,डॉ.मल्लेश आणि उप प्राचार्य डॉ.विराज पाटील उपस्थित होते.