सीमा संघर्ष समन्वय समिती मुंबई यांच्या वतीने यावर्षी मुंबईच्या लालबाग-परळ विभागात मुंबईस्थित सीमावासीयांच्या काळा दिवस निमित्त निषेध सभेचे आयोजन केले आहे. सभेचे ठिकाण लोअर परेल, करी रोड नाका मुंबई दरबार समोर सकाळी ठीक दहा वाजता आयोजित केले आहे.
1956 साली सुरू झालेला काळा दिवस बेळगावमध्ये आज देखील अविरत सुरू आहे. आम्ही आज जरी नोकरीधंद्यात निमित्त बेळगाव मधून बाहेर निघालो असलो तरी आमची मूळ बेळगाव मध्ये आहे. म्हणून आम्ही हा काळा दिवस येथे साजरा करतो व त्याची जाणीव मुंबईस्थित प्रत्येक सीमावासियांना आहे. पण एक सत्य परिस्थिती सांगायची झाली तर या विषयावर आमचे शासन म्हणजे आमचे सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही . आमची भाषा, संस्कृती ,आमची परंपरा टिकवणे हा उद्देश आमच्या लोकांचा आहे म्हणून आम्ही जरी कर्नाटकमध्ये असलो तरी आम्ही एक भारतीय आहोत व भारतीय या नात्याने आम्ही कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडुरप्पा बेळगाव चे पालकमंत्री जगदीश शेट्टर बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांना निवेदन आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला आमची संस्कृती, भाषा टिकवण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करावे अशी मागणी सीमा संघर्ष समितीने केली आहे.
बेळगावात दैनंदिन जीवनातील मुख्य विषय तो म्हणजे सर्व शासकीय कार्यालयात कन्नड प्रमाणे मराठीलाही प्राधान्य देण्यात यावे . आम्ही बेळगाव जिल्ह्यात प्रस्थापित नसून मूळ रहिवासी आहोत. बस वाहतूक सेवेत कन्नड भाषेप्रमाणे मराठीमध्ये नामफलक असावे तसेच सर्व रोड फलकावर दिशानिर्देश कन्नड भाषेत प्रमाणे मराठीलाही देण्यात यावे .मराठी शाळेला कर्नाटक सरकारने अनुदान द्यावे या सर्व मागण्यांची निवेदने आम्ही करत आहोत. परंतु हे सर्व करत असताना महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र सरकार हे सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडत आहे. सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल असेही सीमा संघर्ष समितीने म्हटले आहे.
संघटनेचे अध्यक्ष पिराजी पाटील कायदेशीर सल्लागार प्रमुख बर्मा हराडे,दिलीप मिस्त्री संघटक प्रमुख विजय कुराडे ,गजानन साळुंखे सचिव प्रदीप चौगुले हे निवेदन काळ्या दिनी विविध नेते मंडळींना देणार आहेत.