बेळगाव सह सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ 1956 पासून बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधव काळा दिन सुतक दिन म्हणून पाळतात.गेली 62 वर्षांपासून मराठी भाषक हजारोंच्या संख्येने मूक मोर्चात सहभागी होऊन मराठी आस्मिता दाखवत असतात.
सीमा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने मराठी जनतेने रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या भाषावार केलेल्या प्रांत रचनेचा निषेध करत मराठी अस्मिता दाखवून द्यावी असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व घटकव मराठी संघटनांनी केली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती
शहर महाराष्ट्र एकीकरण समिती
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती
म.ए. समिती महिला आघाडी
बेळगाव शिवसेना सीमाभाग
मराठी युवा मंच
युवा आघाडी आदी संघटनांनी आवाहन केलं आहे
असा असेल मूक सायकल फेरीचा मार्ग
शुक्रवारी सकाळी 9 वाजता संभाजी उध्याना तुन मूक सायकल फेरीस सुरुवात होणार आहे. त्यानंतर भांदुर गल्ली, हेमू कलानी चौक, अंबा भवन,टिळक चौक,परत हेमू कलानी चौक तहसीलदार गल्ली पाटील गल्ली शनी मंदिर कपिलेश्वर उड्डाण पूल, एस पी एम रोड, होसुर बसवाण गल्ली,नार्वेकर गल्ली,आचार्य गल्ली गाडे मार्ग सराफ गल्ली, सराफ कट्टा कोरे गल्ली कचेरी गल्ली, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवा वेस मराठा मंदिर येथे सांगता होणार आहे.