केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेत बेळगाव शहराचा पहिल्या टप्प्यात समावेश झाला झाला पहिल्या 20 शहरात बेळगावची निवड झाली मात्र मागील वर्षी झालेल्या रँकिंग मध्ये बेळगाव 16 व्या क्रमांकावर होते मात्र या वर्षीच्या रँकिंगमध्ये घसरण झाली असून बेळगाव 36 व्या क्रमांकावर पिछाडीवर पडले आहे.
दुसऱ्या टप्प्यात निवड झालेली शिमोगा,दावणगेरे,आणि हुबळी धारवाड ही शहरे मात्र रँकिंगमध्ये बेळगाव पेक्षा पुढे आहेत.
स्मार्ट सिटी योजनेत दावणगेरे 15 व्या स्थानी असून राज्यात अग्रक्रमांक मिळवला आहे तुमकुरु 20,हुबळी धारवाड 29,शिमोगा 30, बंगळुरु 37 मंगळुरू 38 वे स्थान मिळाले आहे.शहरातील स्मार्ट सिटी योजने अंतर्गत होणाऱ्या कामांची मंद गती आणि कामांच्या दर्जा मुळे ही घसरण झाली असल्याचा चर्चा आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेत गैर व्यवस्थापन आहे त्यामुळे योजना सुरू झाल्यापासून आता पर्यंत अनेक अधिकारी बदलले आहेत या शिवाय योजना जरी केंद्रांची असली तरी राज्य सरकारच्या मंत्री आणि आमदारांचा नव्हे तेवढा हस्तक्षेप वाढला आहे त्यामुळे देखील बेळगाव स्मार्ट योजना रेंगाळली आहे इतकेच काय तर अनेक लोकप्रतिनिधीनी आपली पूर्व दिशा म्हणत कामे राबवली आहेत जिल्हाधिकारी पालिका आयुक्त स्मार्ट सिटी एम डी प्रशासक आणि सरकार यांच्यात योग्य समन्वयाचा अभाव असल्याने या योजनतेचे तीन तेरा वाजले आहेत असा आरोप देखील बेळगावकर करताना दिसत आहेत.
स्मार्ट सिटी योजना केवळ बेलगावतच नव्हे तर राज्यात यशस्वी पणे राबवण्यात म्हणावे तेवढे यश आले नाहीं उत्तर भारतातील काही शहर वगळता सर्वत्र तीच स्थिती आहे.केवळ स्मार्ट सिटी नव्हे तर स्वच्छ भारत मध्ये देखील बेळगाव पिछाडीवर आहे स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत बेळगाव शहराला 270वे (एकूण 485 पैकी) राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळाले आहे तर कर्नाटक राज्यात देखील 14 वे नामांकन प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय स्तरावर मागील वर्षी 2017 मध्ये बेळगावचा क्रमांक 248 व्या स्थानावर होता यावर्षी 270 व्या आल्याने 22 फरकांनी नामांकनात घसरण झाली आहे.