कामाला असलेल्या घरातील मंगळसूत्र चोरलेल्या महिलेला पोलिसांनी पकडले असून तिच्याकडून चोरलेले पन्नास ग्रॅमचे दोन लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र कॅम्प पोलिसांनी हस्तगत केले आहे.
पोलिसांनी पकडलेल्या महिलेचे नाव सुनीता वसंत मांजाळकर असे असून ही महिला वंदना नामदेव रेडेकर यांच्या घरी घरकामाला होती.दि.६ ते ११ ऑक्टोबर या दरम्यान सुनीताने रेडेकर यांच्या बेडरूम मधील ड्रॉवरमध्ये असलेले पन्नास ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले होते.
एक दिवस मंगळसूत्र ड्रॉवर उघडून पाहिले असता तेथे मंगळसूत्र नव्हते.त्यामुळे संशयाने सुनीताविरद्ध कॅम्प पोलिसात तक्रार नोंदवली.पोलिसांनी सुनीताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने मंगळसूत्र चोरल्याचे कबूल केले.