ग्रामीण मतदार संघातील खचलेल्या रस्त्याचे काम जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या निधीतून सुरू करण्यात आले आहे.ऐन गणपती दिवशी नंदीहळळी ते गर्लगुंजी हा बेळगाव ग्रामीण भागात येणारा रस्ता खचला होता त्यामुळे इथून रहदारी बंद झाली होती लोकांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागला होता.
त्या नंतर गोरल यांनी जि. पं सी ई ओ राजेंद्र यांना या रस्त्याची कल्पना दिली होती लागलीच सहाय्यक अभियंते खानापूरी यांनी रस्त्याची पहाणी केली होती सोमवारी खचलेल्या रस्त्याचे काम सूरु झाल्याने नागरिकात या भागातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात रस्त्यांची चाळण झालेली आहे पुरात वाहून गेलेले रस्ते जशास तसेच आहेत वाहन चालकांना याचा त्रास होत आहे मात्र जि.पं सदस्य वगळता कोणताच लोक प्रतिनिधी यावर गंभीरपणे दिसत नाही ग्रामीण भागातील इतर रस्ते देखील लवकर दुरुस्त होणे गरजेचे आहे.