ऐन सणात खचलेला गर्लगुंजी ते नंदीहळळी संपर्क रस्त्याचे दुरुस्ती काम उद्या शनिवारी पासून सुरू होणार आहे.नंदीहळ्ळी ते गर्लगुंजी व्हाया कोकण्याची व्हाळ हा रस्ता गणपतीच्या आगमना दिवशी नंदीहळ्ळी जवळ खचला होता.शुक्रवारी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल जिल्हा पंचायतीचे सहाययक अभियंते खानापुरी यांनी पहाणी केली व उद्या पासून रस्त्याची डागडुजी सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
पावसाने हा रस्ता खचल्याने या रस्त्यावर होणारी बस व चार चाकी वाहतूक देखील बंद झाली आहे.बेळगाव ग्रामीण भागात हा रस्ता येत असून कोणत्याच लोक प्रतिनिधीनी या रस्त्याकडे लक्ष दिलेले नव्हते. बेळगाव live ने याबाबत 2 सप्टेंबर रोजी वृत्त देखील प्रसारित केले होते अखेर जिल्हा पंचायत सदस्य रमेश यांनी याची दखल घेत जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र यांना याबाबतची कल्पना दिली होती त्यानुसार राजेंद्र यांनी सहाययक अभियंते खानापुरी यांना रस्ता पाहणीचे आदेश दिले होते.
गणपतीत हा रस्ता खचला तरी स्थानिक आमदार व अधिकाऱ्यांनी अजून लक्ष दिले नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला होता त्यानंतर रमेश गोरल यांनी याची दखल घेत सी ई ओ यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर आता उद्या पासून डागडुजी प्रारंभ होणार आहे तर तीन महिन्यांनी नवीन रस्ता बनवला जाणार आहे.यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य मारुती लोकूर,नंदीहळळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील चार दिवसां पूर्वी बेळगाव live या ग्रामीण मतदार संघातील रस्त्याची अशी केली होती बातमी पहा खालील लिंक मध्ये