पैलवान आतुल शिरोळे ने जागतिक पातळीवर कास्य पदक मिळवून जी कामगिरी केली त्याबद्दल त्याचा सगळीकडे सत्कार गौरव होत आहे .त्याच्याच एका डिझाईन इंजिनिअर असलेल्या मित्राने घरात त्याची रांगोळी काढून सन्मान केला आहे. संजय मुरारी असे निलजी ता बेळगाव येथील त्या मित्राचे नाव आहे .अतुल शिरोळे याची रांगोळी त्याने आपल्या घरी काढली. गणपतीचा सण साजरा करताना गणपतीसमोर अतुलची रांगोळी काढून त्याने सत्कार केला.
पहिले आंतरराष्ट्रीय मेडल मिळाल्यापासून आपली आणि अतुल ची मैत्री आहे. मुचंडी हे आपल्या मामाचे गाव आहे त्यामुळे अतुल शी दोस्ती आहे. कुस्ती बघणे आपल्याला आवडते. त्यामुळे अतुलची मैत्री वाढत गेली आणि रांगोळी काढणे हा छंद असून विरंगुळ्यासाठी रांगोळी काढत असतो. त्याने जर आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवले तर त्याची रांगोळी काढू असे मी वचन दिलं होतं. त्यामुळे पदक मिळवले मिळवल्या मी रांगोळी काढली आहे .असे त्याने बेळगाव लाईव्ह ला सांगितले. अतुल एशियन गेम्समध्ये नक्कीच यश मिळेल असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
‘विमान तळावर झाले या पैलवनाचे स्वागत’
दक्षिण कोरिया येथे नुकताच झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बेळगाव मुचंडीचा पैलवान अतुल शिरोळे यानें कांस्य पदक जिंकले होते.त्याची पुढे होणाऱ्या एशियन गेम साठी निवड झाली आहे. बेळगावला आगमन होताच विमान तळ प्राधिकरणाच्या वतीने त्याचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
एअरपोर्ट डायरेक्ट राजेशकुमार मौर्य यांनी अतुल शिरोळे याचे स्वागत केले यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी व्ही राजेश,सी एन एस प्रमुख प्रताप देसाई, सी पी आय ए पी एस यु बाबू चौगुले,चंदन राणे,सुभाष पाटील,सुब्रमण्यम बाळा,एस एस बांडगे,महेश पाटील सागर मोदगेकर आदी उपस्थित होते.