कामगार नेते आणि वकील एन आत लातूर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील बांधकाम व बांधकाम संदर्भातील कामगारांच्या अनेक समस्याबाबत आवाज उठविण्यात येत आहे. नुकतीच कर्नाटक राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत सचिव के ईश्वराप्पा यांच्याकडे निवेदन देऊन विविध मागण्या मांडण्यात आल्या.
बेळगावातील एकूण 749 कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींना पहिली ते हे त्यांचे संपूर्ण शिक्षण होईपर्यंत त्यांना शैक्षणिक सहाय्य करावे, कर्मचाऱ्यातील प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्यांना 51 हजार रुपये मंजूर करावे, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा म्हणून दोन लाख रुपये मंजूर करावे, कर्मचारी काम करत असताना जर घटना घडली तर त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये तातडीने धनादेश द्यावा,सर्वांना वृद्ध पेंशन म्हणून दोन हजार रुपये प्रत्येक महिना द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी आमदार अनिल बेनके यांनी या सर्व सुविधा हव्या असतील तर प्रत्येक कर्मचाऱ्याने व कामगाराने आपले कामगार कार्ड बनवून घेऊन याचा लाभ घ्यावा ज्याने कोणी हे कार्ड बनवून घेतले नाही त्यांनी तातडीने अर्ज टाकून त्याच्या विभागातील अधिकार्यांची संपर्क साधून हे कार्ड बनवून घ्यावे व तातडीने सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात असे आवाहन केले आहे.