तरुणांमध्ये मोबाईलचे व्यसन निर्माण होण्यास त्यांचे पालकच जबाबदार असल्याची माहिती पुढे येत आहे. विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मोबाईल वापरण्यावर बंधने घालण्याचे काम पालकांच्या हातात असते. मात्र पालके तसे करत नाहीत. त्यामुळेच अनेक घटना घडतात असे मत बेळगाव शहरातील डॉक्टर्स आणि मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
बेळगावातील प्रसिद्ध डॉक्टर रोहित जोशी यांनी सांगितलं की परंपरा आणि धोरण पालकांनी बदलामुळेच मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर सुरू आहे आणि त्यातून घटना घडतात. पालकांनी मोबाईल देत नाही म्हटलं की विद्यार्थी किंवा तरुण चिडतात हे त्यातूनच घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकांनी याबाबतीत सजगता पाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. याचबरोबरीने आणखी एक प्रसिद्ध डॉक्टर माधव प्रभू यांनी सांगितलं मेंदूमध्ये वेगवेगळी केंद्र असतात काही केंद्रे हे दुःखासाठी असतात कोणत्या कारणाने आपल्याला दुःख होईल आणि आपण चिडू हे सांगता येत नाही त्यासाठी मेंदू मध्ये चुकीच्या संवेदना पोहोचणे हे कारण आहे . व्यसनी माणसांमध्ये अशी केंद्रे जास्त एक्टिव असतात त्यातून ह्या घटना घडतात. पब्जी सारखे खेळ हे असेच चुकीच्या संवेदना निर्माण करतात. त्यातून चुकीच्या घटना घडू शकतात .असे ते म्हणाले .
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना किती गुंतवायचे आणि चुकीची माध्यमे उपलब्ध करून द्यायची हे ठरवायला हवे. मोबाईल देण्यापेक्षा योगासने ध्यानधारणा संगीत वेगवेगळे छंद लावून त्यांना सुधारण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले. समाजाने आतातरी जागे झाले पाहिजे असे डॉक्टर माधव प्रभू म्हणाले
काकती येथे एका मुलाने आपल्या पित्याचा खून केल्याच्या घटनेनंतर या डॉक्टरांनी स्वतःहून पुढे येऊन समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.