बेळगाव तालुक्यातील पीडीओच्या कारभाराला जनता वैतागले असले तरी त्यांच्यात मात्र सुधारणा होईल असे काही दिसून येत नाही. बेळगाव तालुक्यातील एका पूर्व भागातील एका पीडिओने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मोबाईल ठेवणे बंद केले आहे. मात्र अनागोंदी कारभारात त्याची रेंज जिल्हा पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगाव शहर संपताच लागणाऱ्या ग्राम पंचायतीमध्ये पीडीओच्या प्रतापला जनता वैतागली आहे. मनमानी कारभारामुळे अनेक सदस्यही ही अवाक् झाले आहेत. मागील काही वर्षापासून तळ ठोकून बसलेल्या त्या पिडीओवर कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकारीही धाडस करत नसल्याचे दिसून येत आहे. कारण लागेबांधे आणि साटेलोटे असल्यामुळेच त्या पीडीओचा वरचष्मा झाला आहे. कोणतेही काम असल्यास त्याच्या हाताखाली असणाऱ्या लोकांचीच संवाद साधावा लागतो. यामुळे त्यांची भेट घेणे देखील आता मुश्कील बनले आहे.त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या पीडिओने बक्कळ माया जमविल्याचेही काही सदस्यांनी सांगितले आहे. मात्र कोणतेही विकास काम करताना संबंधित ग्रामपंचायत मधील सदस्यांना विश्वासात न घेता त्याने मनमानी कारभार सुरू केल्याचे सामोरे येत आहे. असे प्रकार घडत असताना देखील तालुका पंचायत अधिकारी आणि जिल्हा पंचायत वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून बरेच काही साध्य करून घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अनेक विकास कामात सदस्यांना विश्वासात न घेता त्यांनी केलेली माया साऱ्यांनाच माहीत असून याबाबत लवकरच तक्रारही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मागील काही महिन्यांपासून आपल्याला डॉक्टरने सांगितले आहे की मोबाईल वापरू नकोस असे म्हणून मोबाईल बंद केला आहे. त्यामुळे संपर्क साधण्यात देखील कठीण बनले आहे. हाच विषय एका तालुका पंचायत सदस्याने तालुका पंचायत सभागृहात नुकतीच झालेल्या बैठकीत काढला होता. मात्र त्यावर अधिकाऱ्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांचे देखील साटेलोटे आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष करून उद्योग खात्री योजनेत विकासाचे गाजर दाखवून गैरप्रकार केल्याचे सामोरे येत आहे. अशा पिडिओना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे गैरप्रकार वाढत असून अशांवर कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.