गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 26 तासाने शुक्रवारी सायंकाळी संपली .या मिरवणुकीने अनुचित काही केले नाही असे म्हटले तरी दोन-तीन घटना जिव्हारी लागल्यासारखे आहेत .
बस्तवाड येथे पोलिसांचा लाठीमार झाला डॉल्बी मुळे झालेल्या वादावादीनंतर पोलिसांना लाठी चालवावी लागली .ढोल ताशा पथकावर लाठीमार झाला. या घटनेने काही काळ ठप्प झाली होती. आणि वातावरण तंग झाले होते. मिरवणूक सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला मिरवणुकीतील वाहनावर डॉल्बी वर बसलेल्या कामत गल्ली येथील युवकाचा मृत्यू झाला. उर्फ राहुल रमेश सदावर वय 38 असे त्याचे नाव. त्याचा मृत्यू चटका लावणारा असाच आहे.
सर्वोच्च न्यायालयाने डॉल्बीवर बंदी घातली आहे. पारंपरिक वाद्याच्या जोरावर तुम्ही मिरवणूक काढू शकता पण आम्ही ऐकत नाही. आम्हाला डॉल्बीचा दणदणाट पाहिजे आहे , यामुळे डॉल्बी घेऊन जाताना वाजवत असताना डॉल्बी वरून पडून अशावेळी घटनात मृत्यूंची संख्या वाढत आहे. गणपती बाप्पाचा सण आपण कशासाठी करतो, गणपती बाप्पाला नमन करून वंदन करून त्याला भक्तिभावाने निरोप द्यायला पाहिजे मात्र निरोप देताना नको त्या गोष्टी करण्यामुळे असे मृत्यू होऊ लागले. मयत सातेरी सदावरला आमदार किंवा खासदार फंडातून भरपाई निधी मिळेल मात्र ती व्यक्ती परत मिळू शकणार नाही. यामुळे निर्माण झालेली हानी त्याच्या कुटुंबाला सोसावी लागणार आहे. त्यामुळे यापुढील काळात सण साजरे करताना किमान नको त्या घटना घडू नयेत याकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे हीच गरज आहे.
युवकांच्या हुल्लडबाजीमुळे पोलिसांकडून लाठीमार करावे लागले हे घटना हेच दर्शवते. त्याचबरोबरीने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली मिरवणूक शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू होती त्यामुळे गणेशाचे विसर्जन करण्याच्या बाबतीत आपण किती भान न बाळगतो बाप्पासमोर नाचत राहतो आणि उशीर करतो हेच दिसत असून आता आम्ही शहाणे व्हायला हवे आम्ही कधी शहाणे होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.