पूर आलेल्यावेळी शाळांना सुट्टी दिल्याबद्दल शिक्षण खाते आणि प्रशासनाने शनिवार आणि रविवार शाळा पूर्ण दिवस भरविण्याचा आदेश दिला होता.या आदेशाविरुद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते महेश बिर्जे यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.
त्याची दखल राज्य मानव हक्क आयोगाने घेतली असून जिल्हाधिकारी,शिक्षणाधिकारी याना नोटीस बजावली आहे.दि.7 सप्टेंबर पूर्वी तुमचे म्हणणे मांडा अशी नोटीस आहे.राज्य मानव हक्क आयोगाकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे.आठवडा सुट्टी हा मुलांचा हक्क आहे.
सलग शाळा सुरू असल्यामुळे मुले मानसिक दपडपणाखाली वावरत आहेत.त्यामुळे पूर्वप्रमाणे शनिवारी अर्धा दिवस शाळा आणि रविवारी सुट्टी द्यावी अशी मागणी महेश बिर्जे यांनी केली होती.
आगस्ट महिन्यात सात दिवस पूर आल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली होती ते सात दिवस भरून काढण्यासाठी शनिवारी पूर्ण दिवस रविवारी सुट्टीच्या दिवशी शाळा भरवल्या जात होत्या एक रविवार आणि एक शनिवार असे दोन दिवस आता पर्यंत भरून काढण्यात आले आहेत अजून चार ते पाच दिवस भरून काढायचे आहेत त्या अगोदर रविवारी शाळा भरवण्या विरोधात मानव हक्क आयोगा कडे तक्रार करण्यात आली आहे त्याचीच नोटीस डी सी डी डी पी आय ना बजावण्यात आली आहे सात सप्टेंबर पर्यंत उत्तर अपेक्षित आहे.