सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी अवस्था सध्या बेळगाव परिसरात पहावयास मिळत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामांना चालना देत आमचे बरे चालले आहे असे भासणाऱ्या मनपा आणि कॅन्टोनमेंट हद्दीत येणाऱ्या एका बसस्थानकाची अवस्था मागील सहा महिन्यापासून गंभीरच आहे. याकडे लक्ष देण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे गरिबांचा कर रुपी मिळणारा निधी वाया गेल्याचे दिसून येत आहे.
खानापूर रोड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूलाच असणाऱ्या एका बस स्थानकाला मोठ्या प्रमाणात खर्च करून त्याची उभारणी करण्यात आली होती. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ते उखडून टाकण्यात आले आहे. मागील सहा ते सात महिन्यापासून ते बस स्थानक त्याच अवस्थेत आहे. लाखो रुपये खर्चून देखील ते नागरिकांच्या उपयोगात न आल्याने ते बसस्थानक हटवावे अथवा त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहरात सध्या कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱ्या बस स्थानकाची निर्मिती कॅंटोनमेंट प्रशासन करते तर त्याच ठिकाणी परत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुन्हा एका बस स्थानकाची निर्मिती होते. असे होत असताना परत बुडा कडूनही आपल्या हद्दीत अनेक बस स्थानक उभारण्यात येत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी तीन तीन चार चार बस स्थानक निर्माण झाले हे धक्कादायक प्रकार मी पहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या व्यवस्थेसाठी एकच सुस्थितीत बस स्थानकाची निर्मिती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दोन-दोन तीन-तीन बस स्थानक असूनही त्या ठिकाणी मात्र बस थांबत नसल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱ्या बस स्थानकाचे दुरावस्था पाहिल्यास केवळ पैसा वाया घालण्याचे काम प्रशासन करत असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यामुळे यापुढे तरी असे प्रकार थांबून नागरिकांना योग्य सुविधा देण्यावर भर दिल्यास दिलासा मिळणार आहे.
बस थांब्याकरीता एक शेड असताना दुसरे शेड उभे करण्यात येते असे शहरात अनेक ठिकाणी पहावयास मिळते बस थांबे आहेत जनता याचा वापर करताना कमी दिसते अशी पैश्याची उधळ पट्टी करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे.