Friday, March 29, 2024

/

उद्या परवा पूर्ण दिवस शाळा-शनिवारी रविवारी भरणार शाळा 

 belgaum

पुरातील सुट्ट्या भरून काढण्यासाठी उद्या परवा म्हणजे शनिवार रविवारी बेळगावातील शाळा पुर्ण दिवस भरणार आहेत त्यामुळे गणेश उत्सवातील सुट्टीत देखील मुलांना शाळेला जावे लागणार आहे.
बेळगावात पूरस्थितीमुळे मागील महिन्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.जिल्हा प्रशासनातर्फे सदर सुट्टीची भरपाई करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्याने गणेशोत्सवातील शनिवार रविवारी देखील पुर्ण दिवस शाळा भरणार आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शनिवार दि. 7 सप्टेंबर आणि रविवार दि.8 सप्टेंबर रोजी पुर्ण दिवस भरणार असल्याचे शिक्षण खात्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

पावसामुळे गणेशभक्तांचा हिरमोड झाला असताना गणेशोत्सवात सुट्टी दिवशी शाळेत जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुसरी कडे वकील महेश बिरजे यांनी रविवारी सुट्टी देऊ नये अशी याचिका मानव हक्क आयोगाकडे केली आहे त्यावर देखील प्रशासन लेखी उत्तर देणार आहे त्या बरोबर शनिवारी रविवारी पूर्ण दिवस शाळा भरवण्याचा आदेश दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.