Sunday, December 29, 2024

/

‘पैलवान अतुल शिरोळे याने मारले कोरियाचे मैदान’

 belgaum

गरीब कुटुंबातुन संघर्ष करत असलेल्या मुचंडी येथील पैलवान अतुल शिरोळे यानें आपल्या कारकीर्दीतील दुसरे आंतरराष्ट्रीय पदक मिळवले आहे.दक्षिण कोरिया येथे 2 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत 86 किलो वजन गटात पदकाची कमाई केली आहे त्याने हे पदक फ्री स्टाईल कोरियन कुस्ती प्रकारात मिळवत बेळगावचे नाव पुन्हा एकदा उज्वल केलं आहे.

गुरुवारी झालेल्या साखळी सामन्यात त्याने इराण आणि कझाकस्थान पैलवानांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता त्या नंतर उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या मल्लाकडून त्याला 1-0 निसटता पराभव स्वीकारावा लागला.कोरियन मल्लाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्याने त्याला कांस्य पदकासाठी संधी मिळाली त्याने या संधीचा फायदा उठवत दक्षिण आफ्रिकेच्या पैलवानाचा 6-1 अंतराने पराभव करत कांस्य पदकाची कमाई केली.

Atul shirole medal

दक्षिण कोरियात आयोजन केलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 100 देशातील 4000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता भारताचे 86 किलो वजन गटात प्रतिनिधित्व करत शिरोळे यानें कांस्य मिळवलं यामूळे त्याची पुढील होणाऱ्या एशियन गेम्स साठी निवड झाली आहे. बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावच्या पैलवानाने या अगोदर 2016 साली रशिया मधील जॉर्जियात ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत देखील कांस्य मिळवले होते तर 2017 साली तुर्कमनीस्तानइन डोअर एशियन गेम्स मध्ये पाचवा क्रमांक आला होता.

अनेक सामाजिक संस्था दानशूर व्यक्तींनी पैलवान अतुल याला कोरिया स्पर्धेत साठी आर्थिक मदत केली होती त्या सर्वांचे अतुल याने आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.