बेळगावचे बिशप रेव्हरंड डॉ.डेरेक फर्नाडिस हे सध्या रोमच्या दौऱ्यावर असून ते अड लुमिना मीटिंगमध्ये भाग घेणार आहेत.मंगळवारी बिशपनी पोप फ्रान्सिस यांचा भारतीय पारंपरिक पद्धतीने शाल घालून सत्कार केला.यावेळी पोपनी बेळगाव डायोसिस च्या कार्याची प्रशंसा केली.
विशेष म्हणजे पूरग्रस्तांना केलेल्या मदत कार्याचे पोपनी कौतुक करून बेळगाव डायोसिस ला शुभेच्छा दिल्या आहेत.भारतातील 54 बिशप आणि आर्चबिशप सध्या रोममध्ये होणाऱ्या बैठकीत भाग घेण्यासाठी गेले आहेत.
पोपनी भारतातील बिशप आणि आर्चबिशप यांच्या कार्याची माहिती घेतली.भारतातील सद्य परिस्थितीची देखील माहिती त्यांनी घेतली.पुराग्रस्तासाठी आम्ही केलेल्या कार्याचे आणि 2500 पुरग्रस्तांचे पुनर्वसन कार्याचे कौतुक पोपनी केले अशी माहिती बिशप डेरेक यांनी दिली.