Saturday, April 27, 2024

/

भाजपचे राजकारण चाललंय तरी काय?

 belgaum

कर्नाटकात सत्ता भोगत असलेल्या निजद आणि काँग्रेस युती सरकारला फोडून भाजपने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. युतीतील आमदारांना फोडण्यात आले. त्या सार्‍यांना माजी सभापती रमेश कुमार यानी अपात्र ठरवल्यानंतर ही कर्नाटकात भाजपची सत्ता आली असताना सत्तास्थापनेच्या राजकारणात भाजपच्या प्रतिमेचा भंग झाला.
कर्नाटकातील जनतेने काँग्रेस आणि निजद या बाजूने आपला कल असल्याचे दाखवून दिले. असले तरी सरकार भाजपचे आले आहे.
भाजपचे सरकार स्थापन करत असताना मात्र अनेक वरिष्ठ नेत्यांना फाटा देऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आल्यामुळे कर्नाटकात भाजपचे काय चालले आहे ?असा प्रश्न सध्या राजकीय विश्लेषकांना ही पडला आहे .

पुढील निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला व निजदला होऊन त्यांच्या जागा वाढू शकतात ही बाब भाजपच्या वरिष्ठांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आपल्या पक्षात नाराजीचा सूर तयार होऊन हे सरकार पडावे अशी अपेक्षा भाजप पक्षाने ठेवली असून तसे राजकारण करायला येडीयुरप्पा यांना भाग पाडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सध्या 17 जणांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे . अपात्र उमेदवारांचा प्रश्न आहेच, त्याचबरोबरीने पक्षातील वरिष्ठांचे काय? हा प्रश्न निर्माण होऊन अनेकांकडून बंडखोरी होऊ शकते .त्यामुळे भाजपचे सरकार ही अडचणीत येण्याची शक्यता आहे, आणि ही अडचणच भाजप वरिष्ठांना पाहिजे असल्याचे दिसत आहे. त्या प्रकारची सहानुभूती तयार करून ती पुन्हा आपल्या पक्षाला मिळावी आणि येत्या निवडणुकीत आपल्या जागा जास्त याव्यात या दृष्टीने राजकारण केले आहे की काय असे राजकीय विश्लेषक बोलत असून तशी चर्चा जोरात सुरू आहे.

खरे तर मंत्रिमंडळाचा विस्तार करताना अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी द्यायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. बेळगाव जिल्ह्यात भालचंद्र जारकीहोळी आणि उमेश कत्ती या सारख्या नेत्यांना फाटा देण्यात आला. इतर ठिकाणी असेच चित्र आहे. अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक होते तर त्यांना डावलण्यात आल्यामुळे आता ते सरकारला धक्का देणार की काय ?असा प्रश्‍न असून तसे ठरवून केले जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुढील काही दिवसात सरकारचे भवितव्य भवितव्या वरून भाजपच्या राजकारणाची गणिते समोर येणार आहेत.

 belgaum

आठ वेळा आमदार असलेल्या बेळगाव जिल्ह्यावर मजबूत राजकीय पकड असणाऱ्या उमेश कत्ती व गेली सतत 15 वर्षे जिल्यात या घराण्यातील मंत्री असलेल्या जारकीहोळी परिवाराला पहिल्यांदाच मंत्री पदापासून वंचित रहावे लागले आहे.भाजप हाय कमांडने उमेश कत्ती आणि जारकीहोळी या दिग्गज कुटुंबांना बाहेर करत अथणी मधून आमदारकी ची पराभूत झालेल्या लक्ष्मण सवदी यांना एंट्री दिली आहे. या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना मंत्री न केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम होणार आहेत पुन्हा एकदा जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.