तो एक बॉक्सर. कर्नाटक टीम चे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली. बंगळूर येथे स्पर्धा होती. जायचे होते. पण मुसळधार पावसाने गावाला चारी बाजूने पुराच्या पाण्याने वेढा घातलेला. त्याच्या पित्याने त्याला प्रेरणा दिली. तो आणि त्याचा बाप पोहत मुख्य रस्त्यावर आले आणि तो पोहत गेला त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी.
ब्रेव्हो. सलाम या युवकाला. अडीज किलोमीटर पोहून जाऊन रौप्य पदक जिंकलेल्या त्या बारावीत शिकणाऱ्या बॉक्सर चे नाव आहे निशांत मनोहर कदम. 7 ऑगस्ट ला त्याला बेळगावला येऊन बंगळूर ची रेल्वे पकडायची होती. पण गावातून बाहेर पडायचे तिन्ही रस्ते पाण्यात वाहून गेले होते.
निशान चे वडील मनोहर हे शेतकरी. बॉक्सिंग ची किट एक प्लास्टिक पिशवीत घट्ट बांधून त्यांनी पोहत जाण्याचा निर्णय घेतला. मन्नूर हुन मुख्य रस्त्या पर्यंत अडीज किलो मीटर पोहण्यास त्याला 45 मिनिटे लागली. निशान हा ज्योती कॉलेज चा विद्यार्थी आहे. अर्जुन पुरस्कार पात्र मुकुंद किल्लेकर यांच्याकडे दोन वर्षांपासून तो बॉक्सिंग शिकत आहे. एवढे त्रास घेऊनही त्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. ब्रेव्हो. सॅल्युट!
कोणतेही यश मिळवायचे असल्यास साहस करावं लागतं निशान हे साहस जिंकण्यासाठी करून दाखवलंय इंग्लिश मधली म्हण dare to win.. खरी करून दाखवली आहे.