सध्या मुसळधार पावसाने जोरदार हादरा दिला आहे. हजारो एकर शेत जमीन पाण्याखाली गेली असताना दुसरीकडे मात्र भात व्यापाऱ्यांनी भाताचे दर तसेच ठेवले आहेत. त्यामुळे भात विकणाऱ्या शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भात लागवड झाली की व्यापारी भात दर वाढवितात. कारण भाताची आवक घटते. त्यामुळे दर वाढविण्यात येतो. यावर्षी मात्र केवळ मोजक्याच शेतकऱ्यांनी भात पीक विकले नाहीत. दर वाढल्यानंतर भात विकू अशी आशा ठेऊन त्यांनी भात ठेवले आहे.
मागील दोन महिन्यापासून इंद्रायणी भाताचा दर बावीसशे रुपये प्रति क्विंटल आहे. हा दर नागपंचमी दरम्यान वाढणार अशी शक्यता होती त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपले भात तसेच ठेवून ऑगस्ट महिन्यात विक्री करू असे ठरविले होते .मात्र दर वाढविण्यात न झाल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे.
(फोटो:मार्कन्डेय नदीचे कंग्रा ळी खुर्द येथील पात्र)
अनेक भागात पावसाने कहर केला असून हजारो हेक्टर भात पीक पाण्याखाली गेले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून व्यापार आणि भात दर स्थिर ठेवले आहेत त्यामुळे भातदर वाढवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.