जिल्ह्यातील पुराने आणखी एक बळी घेतला असून सेवा बजावत असताना एका फौजदाराचा अपघाती मृत्यू झाला आहे.इरण्णा लट्टी (४६) असे मृत्युमुखी पडलेल्या फौजदाराचे नाव आहे.
कित्तूर जवळील मलप्रभा नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली आहे.वाहतूक नियंत्रणाचे कार्य करत असताना एका कारने जोराची धडक फौजदाराला दिली.जोराची धडक बसल्यावर फौजदार खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला.
खाली पडल्यावर त्यांच्या कानातून रक्त आले.यावेळी तेथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना त्वरित बेळगावला उपचारासाठी आणले पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.या पुरात मयत झालेल्यांची संख्या दोन झाली आहे काल अथणी मध्ये एकटा वाहून गेला होता.