बेळगावचे आमदार अनिल बेनके यांनी पूरपरिस्थितीत केलेल्या मदतीची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. स्वता पाण्यात उतरून जनतेला धीर देण्याबरोबरच जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे आमदार अशी ओळख या परिस्थितीत त्यांनी निर्माण केली आहे.
घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याचे नुकसान झालेल्या 200 कुटुंबाला महिनाभराचे धान्य साहित्य देऊन त्यांचा आधार ते बनले आहेत.
सरकारी योजनांचे कागद भरून देऊन नुकसान भरपाई मिळवून देतो असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींची बेळगावात कमी नाही. पण नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी स्वतःचे कार्यालय उपलब्ध करून त्यासाठी ते राबत आहेत.
तात्काळ मदत मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे अशा वेळी काही कुटुंबांना घरी खायला अन्न नाही याची कल्पना आल्यानंतर आमदार बेनके यांनी 200 कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि दोनशे कुटुंबांना महिनाभर लागेल इतके साहित्य त्यांनी पुरवले असल्यामुळे त्या कुटुंबांचे जीवन सुखकर होणार आहे. आमदार बेनके यांनी हे काम करून अनेकांना आधार दिला अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. लोकप्रतिनिधींनी या सारख्या आमदारांचा आदर्श घ्यावा असेच हे काम आहे.




