बेळगाव शहरात गोवा आणि पश्चिमहाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना अडवणूक करून त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करणार्या पोलिसांमुळे बेळगाव शहरातील व्यापारावर परिणाम झाला आहे .
खरेदीसाठी येणारे नागरिक कारवाईच्या भीतीमुळे बेळगाव शहराकडे येणार करत असून निर्माण झालेल्या आर्थिक कोंडी ची जबाबदारी कोण घेणार?
बेळगाव शहरातील पोलिस अधिक कार्यक्षम झाले आहेत. रिक्षामध्ये मीटर, हेल्मेट वर कारवाई करतानाच बाहेरून येणाऱ्या गाड्यांचे नंबर प्लेट तपासून एम एच किंवा जी ए या गाड्यांवर कारवाई सुरू आहे . वेगळा वेगळया चौकात थांबून पोलिसी कारवाई करत असले तर त्यामुळे बेळगावला खरेदी आणि इतर कारणासाठी येण्याचा देण्याच्या मानसिकतेत बदल होत आहे.
बेळगावला गेले की पोलिस अडवून दंड वसूल करतात अशी एक मानसिकता गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे ते बेळगाव पेक्षा कोल्हापूर कडे आकर्षित होऊ लागले आहेत. महामार्गावरून थेट कोल्हापूरला जाऊन तेथे होलसेल खरेदी करण्याचा विचार गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये होत आहे, त्यामुळे व्यापारी वर्गाने आता पोलिस आयुक्तांची भेट घेऊन जाचक कारवाई थांबवावी, अशी मागणी केली आहे, महाराष्ट्र व गोवा पासिंगच्या सरसकट वाहनांना अडवून दंडात्मक कारवाई करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आता पोलिसांना सूचना देणे गरजेचे आहे.
पोलिसांना कोणतीही गाडी थांबवून त्याची तपासणी करण्याचा अधिकार आहे पण स्थानिक गाड्यांना थांबवले जात नाही आणि फक्त बाहेरची वाहने थांबवले जात असल्यामुळे बेळगाव पोलीस यांच्याबद्दल संशय निर्माण झाला आणि त्याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत आहे.