बेळगाव तालुक्यातील मन्नूर आंबेवाडी आणि शहरातील शेकडो घरांची पडझड होऊन बेघर झालेल्याना गेल्या तीन दिवसां पासून जेवण वितरित केले जात आहे.दररोज अंदाजे पाच हजार पाकीट बनवून वेगवेगळ्या भागात वितरित केली जात आहेत.
जरी स्वयंपाक करण्यापासून वितरित करण्याचे काम या भागातील स्वयंसेवी युवक करत असले तरी याचा पूर्ण खर्च कांगले गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपीनकट्टी हे उचलत आहेत.
कांगले गल्ली कोपऱ्यावर पंडाल उभा करण्यात आला असून इथेच स्वयंपाक बनवला जात आहे आलेल्या वितरित करून पाकीट बनवून पूर ग्रस्तांना पाठवले जात आहेत.
माणुसकीचा धर्म जपायचा म्हणून आपद्ग्रस्त लोकांची जेवणाची सोय केली आहे कुणाचेही पोट भरण्या एवढे पुण्य काम जगात कोणतेच म्हणून आम्ही हे कार्य करत आहोत. आमची प्रेरणा घेऊन इतरांनी या कामात हातभार लावतील हीच अपेक्षा आहे.बेळगाव व्यतिरिक्त खानापूर मधील पीडितांना देखील मदत पोचवणार आहोत प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपीनकट्टी यांनी बेळगाव live कडे दिली आहे.