Sunday, May 5, 2024

/

माझी म्हस सोडून कशी येऊ?आज्जीबाईचा आर्त टाहो

 belgaum
बेळगावात पुराच्या पाण्यात अडकलेल्याना नौदल आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून मदत दिली जात आहे .अशीच मदत मिळाल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या एका ८० वर्षांच्या आजीने मी माझ्या म्हशीला सोडून येणार नाही .मी माझ्या म्हशीला सोडून कसे येऊ असे म्हणत आर्त टाहो फोडला आणि हेलिकॉप्टरमधून उडी घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी तिला सावरले आणि बेळगाव विमानतळावर आणून सोडले आहे.
 मुधोळ जवळील चनाळ येथे तिचा मुलगा आणि सून असे तिघे एका घरावर बचावासाठी हात करत थांबले होते .अशावेळी या तिघांनाही  वाचवण्यात आले तर मुधोळ येथील तिघांनाही आज प्रकारे वाचण्यात आले आहे. त्यापैकी एकाने मी माझ्या कुत्र्याला हेलिकॉप्टरमधून घेऊन येतो असे उद्गार काढले.  शेतकऱ्यांची भावना किती आपल्या लाडक्या प्राणांशी किती जोडलेली असते मन किती जोडलेले असतात याची कल्पना या घटनेतून येते.
Helicopter help buffallow
हेलिकॉप्टर ने घेऊन जाताना बेळगाव विमानतळावर येण्यापूर्वीमाजी म्हस म्हणून ती आज्जी ओरडली. आज बागलकोट जिल्ह्यातील पुरग्रस्थाना  बेळगावला  घेऊन येत असताना ही घटना घडली.
त्या हेलिकॉप्टर मधून एकूण सहा जणांना वाचवण्यात यश आले.बेळगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एच बी मुद्देप्पा यांच्या नेतृत्वाखालीशंकर घोडी( 32 )आई शांतव्वा व 80 वर्षाची आज्जी बसव्वा तसेच
मुधोळ येथील शासप्पा उदगट्टी (34)रामप्पा पी दिद्दीमनी (40) व सदाशिव बागोडी( 44) यांना वाचवण्यात आले आहे.
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.