बेळगावच्या कॉलेज रोडवर नेहमी गजबजलेल्या असलेल्या मार्गावर जुन्या न्यू ग्रँड हॉटेल समोर असलेला धोकादायक विद्युत खांब बदलण्यात आला आहे.शुक्रवारी सायंकाळ बेळगाव live ने ‘या मुळे अनेकांचा जीव धोक्यात’ अशी बातमी केली होती. बातमी करताच केवळ दोन तासांत हेस्कॉम धोकादायक खांबांची दुरुस्ती केली आहे.
सदर खांब वाहनाने धडकल्याने मोडकळीस आला होता याची बातमी करताच हेस्कॉम अधिकाऱ्यांनी काही तासात नवीन खांब बसवला.
या खांब्याच्या आसपास शाळा आहेत या शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांना धोका आहे. तसेच या रस्त्यावरून वाहनांची संख्या जास्त असते. त्या वाहनांवर खांब पडला तर जीव जाण्याची शक्यता आहे अशी बातमी केली होती. वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती कामानाचे यांनी खांब न बदल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता प्रशासनाने याची दखल घेत शुक्रवारी सायंकाळी खांब बदलून नवीन खांब उभा केला आहे.
तीन दिवसांपूर्वी खानापूर जवळील रुमेवाडी शेतीत गहाळ झालेली विद्युत भारित तार शेतात भांगलन करणाऱ्या पडल्याने निष्पाप महिलेचा बळी गेला होता हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणा मुळे अश्या घटना घडत असून बेळगाव शहरात देखील अनेक खांब धोकादायक बनले आहेत याची दखल हेस्कॉम ने घ्यायला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी बेळगाव live ने केलेली बातमी अशी होती.