सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा आणि घटप्रभा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.दोन्ही नदी काठावरील गावातील जनतेने त्वरित गाव सोडून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी केले आहे.
सेना, पोलीस,आपत्ती मदत पथक,अग्निशामक दल आदींचे जवान, अधिकारी मदत कार्यात गुंतले आहेत.जनतेला आणि पाळीव जनावरांना सुरक्षितस्थळी पोचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे.कोणीही पाण्यात पोहण्याचा किंवा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
अजूनही जे लोक नदीकाठच्या गावात वास्तव्य करून आहेत त्यांनी त्वरित गाव सोडावे.कोणत्याही प्रकारची समस्या असलयास मदत हवी असल्यास पोलीस तसेच महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.