Thursday, January 9, 2025

/

मेजर ने तिला पोहून बाहेर काढले

 belgaum

मराठा लाईट इन्फन्ट्री च्या मेजर राजपाल सिंग राठोड यांनी 15 फूट खोल पाण्यात पोहून एक अडकलेल्या महिलेला सुरक्षितरीत्या बाहेर काढले आहे.
मसगुप्पी या गावात ही घटना घडली. एक महिला खोल पाण्यात अडकली होती. बचाव करण्यास गेलेल्यांना ती नकार देत होती. अखेर मेजर राठोड यांनी तिला आपल्या पाठीवर घेतले व पोहत बाहेर काढले.

Major saved life
मराठा चे जवान असोत वा अधिकारी आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवण्यात एक पाऊल पुढे आहेत. पुरात हे उदाहरण मराठा ची संकटात धावून जाण्याची वृत्तीच दाखवत आहे.

बेळगाव बागळकोट विजापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मराठा सेंटर,इंजिनिअरस,पॅरा कमांड सह नौदलाचे जवान राहत आणि बचाव कार्यात राबत आहेत.केवळ सीमेवर राहून रक्षण करत करत देशांतर्गत संकटात देखील हे जवान कार्य करून जनतेची देशाची सेवा बजावत आहेत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.