Monday, April 29, 2024

/

बेळगावमध्ये पेट्रोल हॅवाक

 belgaum

पेट्रोल आणि डिझेल चा साठा संपला आहे अशी अफवा पसरल्याने बेळगावमध्ये पेट्रोल आणि डिझेल हॅवाक पाहायला मिळत आहेत. पुढे आठवडा पेट्रोल डिझेल मिळणार नाही असा समज करून घेतलेले नागरिक पेट्रोल पंपासमोर गर्दी करत आहेत.

काही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर आले नाहीत. यामुळे पंप बंद आहेत. सुरू असलेल्या पंपावर गर्दी होत आहे. पेट्रोल पंपावरील ताण वाढत आहे.गुरुवारी उघडीप पडल्याने शहरातील अनेक पेट्रोल पंपवरील गर्दी झाली होती.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती आज सकाळपासून परत गर्दी होत आहे. बेळगाव शहरातील जे पंप सुरू आहेत त्यांच्यासमोर गर्दी जास्त आहे. याचा ताण पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बसत आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.