belgaum

तर… जप्त 500 ऑटोचां लिलाव -पोलीस आयुक्त

0
518
Lokesh kumar
लोकेश कुमार बेळगाव पोलीस आयुक्त
 belgaum

बेळगाव पोलिसांनी विना मीटर भाडे घेणाऱ्या ऑटोवर कारवाई करायला सुरुवात केली असून गेल्या 15 दिवसांत मीटर न बसविलेल्या 500 ऑटो रिक्षा जप्त केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी दिली.पत्रकारांनी ऑटो मीटर बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा आकडा जाहीर केला.

सध्या शहरात रहदारी पोलीस दररोज विना मीटर रिक्षा चालवणाऱ्या कारवाई धडाका चालूच आहे केवळ 15 दिवसांत 500 ऑटो जप्त केले आहेत जप्त केलेले रिक्षे जर का सोडवून घेतले नाहीत तर दोन महिन्यांनी त्या रिक्षांचा लिलाव करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. या शिवाय गणेश उत्सवा नंतर ऑटो मीटर विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले .

बेळगाव शहरात गोवा आणि पश्चिमहाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना अडवणूक करून त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करणार्‍या पोलिसांमुळे बेळगाव शहरातील व्यापारावर परिणाम झाला आहे याबाबत पत्रकार परिषदेत त्यांना जाणीव करून दिली असता त्यांना याबाबत माहिती घेतो असे म्हटले आहे. गोवा आणि महाराष्ट्र पासींग गाड्यांवर पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे त्याचा बाजारपेठेवर परिणाम होत आहे अशी बातमी बेळगाव Live ने दिली होती त्या विषया बद्दल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.