जिल्हा पंचायतीच्या बैठकीत शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांच्या अनेक भ्रष्ट कारभारावर प्रकाश टाकल्यामुळे त्यांची भंबेरी उडाली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांची बदली इतरत्र करावी अशी मागणी रमेश गोरल यांनी केली आहे.
गंजक्या सायकल वाटण्यात आल्याने निर्माण झालेला भ्रष्टाचार उघडकीला आला. भ्रष्टाचाराचे पडसाद जिल्हा पंचायतीच्या बैठकीत उमटले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. पण त्या प्रश्नांना त्यांना उत्तर देता आले नाही.मागील वर्षी किती सायकली वितरित झाल्या किती विद्यार्थ्यांना सायकलींचे वारंटी आणि ग्यारंटी कार्ड दिलीत?बी ई ओ यांनी मागील वर्षीच्या सायकलींच्या तपासणी हजेरी केली का? या वितरणात डी डी पी आय बी ई ओ यांनी शासकीय नियम पाळले आहेत का? अशी प्रश्ने विचारता डी डी पी आय निरुत्तर झाले.यामुळे जिल्हा पंचायतीत ठराव करून शिक्षणाधिकाऱ्यांची बदली करून टाकावी आणि नवीन प्रामाणिक शिक्षणाधिकारी रुजू करावेत अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत खराब सायकलींचा मुद्दा रमेश गोरल यांनी उपस्थित केला.यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी ए बी पुंडलिक यांना धारेवर धरले.गोरल यांनी निकृष्ठ सायकली विद्यार्थ्यांना वितरित कशा करता?खराब सायकली विद्यार्थ्यांना कशा देता अशी प्रश्नांची सरबत्ती पुंडलिक यांच्यावर केली.यावेळी पुंडलिक निरुत्तर झाले.अखेर खराब सायकली प्रकरणी एक समिती नेमून एकंदर प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या 216 सायकली खराब असल्याने त्यांचे वितरण रद्द करण्याची मागणी शिक्षण समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी केली होती.त्यावर सी इ ओ राजेंद्र यांनी देखील याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.सगळ्या प्रसार माध्यमांनी खराब सायकलींचा मुद्दा लावून धरला होता.आता जिल्हा पंचायत बैठकीत या विषयावर वादळी चर्चा झाल्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.