वडगावची ग्रामदेवता,जागृत देवता,भक्तांच्या संकटाला धावून येणारी देवता अशी ओळख मंगाई देवीची आहे.लाखो भाविकांची ही देवी श्रद्धास्थान आहे.दर मंगळवारी भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात आणि श्रावणातल्या मंगळवारी तर देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने येतात.
श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगाई देवीची पूजा लोण्याने करण्यात आली आहे.लोण्याची विशेष पूजा करण्यासाठी दहा किलो लोण्याचा वापर करण्यात आला आहे.ही विशेष पूजा पाहून अनेक भक्तांनी समाधान तर व्यक्त केलेच शिवाय पंच कमिटीला देखील धन्यवाद दिले आहेत.मागील काही दिवसांपूर्वी श्रावण देवीची पूजा द्राक्षांचा वापर करून करण्यात आली होती.
मंगाई देवस्थान ट्रष्टच्या वतीने खास श्रावणी मंगळवार निमित्त ही आरास करण्यात आली असून मंगळवारी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे त्यातल्या त्यात देवीचा लोणी अवतार पहाण्यासाठी गर्दी वाढत आहे