पहिल्याच पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबून घरात पाणी शिरले.अनेक ठिकाणी गटारात प्लास्टिक अडकल्यामुळे गटारी तुंबून गटारीतील पाणी रस्त्यावर आले. दुर्गंधीयुक्त पाण्यातून नागरिकांना चालत जावे लागले.
सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे पण ती कागदावरच राहिली आहे.शहर परिसरातील अनेक ठिकाणी नदी,नाले,ओढे यामध्ये कचरा,प्लास्टिक टाकून जलस्रोत दूषित करण्यात येत आहेत.
शेवटी हे पाणी आपल्यालाच येणार आहे याचे भान कचरा टाकणाऱ्यानी बाळगणे आवश्यक आहे.होनगा येथील राष्ट्रीय महामार्गा शेजारून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीत तसेच काठावर प्लास्टिक,कोंबड्याची पिसे,मृत जनावरांचे कलेवर टाकण्यात येत आहे.
मार्कंडेय नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच कृषिसाठी केला जातो.त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील मार्कंडेय नदीच्या पुला जवळील कचरा गोळा करून साफसफाई करणे आवश्यक आहे.
या अगोदर कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीन या विरोधात आवाज उचलला होता शहरातील वेगवेगळ्या भागातील अनेक प्रकारची घाण व कचरा या गावच्या हद्दीतील मार्कंडेय नदीत आणून टाकण्यात येत असून नदी दूषित होत आहे असा आरोप केेला होता मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते पुन्हा काकती कडे नदीत प्लास्टिक टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.