पोलीस बंदोबस्तात रिंग रोड च्या मार्किंग साठी आलेल्या पथकालाही आज शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आणि आम्ही न्यायालयीन लढा लढू असा इशारा दिला आहे.गुरुवारी सकाळी संतीबस्तवाड वाघवडे शेतवाडीत महामार्ग आणि केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मार्किंग करण्यासाठी आले होते.
प्रचंड शेतकऱ्यांचा विरोध तालुक्यातील 33 गावांच्या जमिनी जाणार यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश अशा परिस्थितीत आज पासून केंद्रीय पथक आणि महामार्ग प्राधिकरण रिंग रोडचे मार्किंग करण्यास आले होते. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. पण शेतकरी शक्तीच वरचढ ठरली.केंद्रीय अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी शासनाने तीन हजार कोटी मंजूर केले असून शेतकऱ्यांना चार पट नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन दिले तरी आपण अल्प भू धारक शेतकरी आहोत एक इंच जमीन देखील बळकावू देणार नाही असा पावित्रा घेतला.
रिंग रोड साठी 427.17 हेक्टर जमीन घेण्यात येणार असून 68.03 किलोमीटर लांबीचा हा रस्ता होणार आहे. त्याची रुंदी 200 फूट असणार आहे .शेतातून जाणारा मार्ग 200 फुटाचा कशासाठी असे म्हणणे मांडून शेतकऱ्यांनी याला विरोध केला .त्यामुळे शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत तरी रिंग रोडचे मार्किंग करण्यास केंद्रीय पथक आले होते.
यापूर्वी स्थानिक अधिकारी रिंग रोडच्या मार्किंग ला गेले असता त्यांना पिटाळून लावण्यात येते त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात केंद्रीय पथक आले होते.मार्किंग झाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना नोटीस देऊन हरकती मागवून घेतले जाण्याची शक्यता आहे, हे ओळखून आम्हीच न्यायालयीन लढा लढू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.पोलीस निरीक्षक संगमेशपोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी यांच्या उपस्थितीत शेतकरीनी आज केंद्रीय पथकाचीही भंबेरी उडवली.