यंदा जून महिना कोरडा गेला आणि शेवटच्या आठवड्यात दोन ते तीन दिवस पडलेल्या तुफान पावसाने शहर धुवून काढले आहे. मागील वर्षी पूर्ण जून महिन्यात पडलेल्या पावसाच्या 7.26 टक्के अधिक पाऊस यावर्षी फक्त शेवटच्या टप्प्यात बेळगाव तालुक्यात झालाय. यंदा जून महिन्यातील सरासरी पाऊस 240 मीमी इतका झाला असून मागील वर्षी ही आकडेवारी 166 मीमी इतकी होती.
बेळगाव तालुक्यात पर्जन्य खात्यातर्फे तसेच इतर अनेक विभागांकडून 10 ठिकाणी पाऊस मोजला जातो. बेळगाव सर्किट हाऊस, बेळगाव रेल्वे स्टेशन, बागेवाडी, देसुर, काकती, राकसकोप, सांबरा विमानतळ, संती बस्तवाड, सूळेभावी आणि उचगाव याठिकाणी पाऊस मोजला जातो.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
याठिकाणी जून महिन्यातील पावसाच्या नोंदी अशा आहेत.
बेळगाव सर्किट हाऊस 179 मीमी
बेळगाव रेल्वे स्टेशन 130.6 मीमी,
बागेवाडी 212.4 मीमी
देसुर 212.4 मीमी
काकती 193.2 मीमी
राकसकोप 260.3 मीमी
सांबरा विमानतळ 170. 8 मीमी
संती बस्तवाड 149.6 मीमी सूळेभावी 117.2 मीमी
उचगाव 195.4 मीमी