पाण्याची गरज ओळखून पाणी वाया घालवण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. आता फार उशीर झाला आहे मात्र सध्याची गरज आहे की पावसाचे पाणी वाचवायला हवे, पारंपरिक पद्धतीने का होईना ग्रामीण भागांमध्ये पाणी वाचविले जाते, सांगतायत बेळगावचे जी जिओलॉजीस्ट सागर वाघमारे.
यावर्षी पाऊस पडण्यापूर्वी पाण्याची समस्या गंभीर झाली होती. देशभरातल्या वेगवेगळ्या भागात ही समस्या गंभीर झाली. त्यामुळे लोकांना पूजाअर्चा होमहवन आणि प्राण्यांचे बळी द्यावे लागले. गाढवाचे लग्न करावे लागले. मात्र हे सगळं करण्यापेक्षा पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा थेंब वाचवला तर अशा समस्या निर्माण होणार नाहीत. याची काळजी घ्यायला पाहिजे. असे वाघमारे म्हणाले.
सध्या पाऊस नुकताच सुरु झाला आहे आणि पाणी अडवून वाचवण्याची हीच खरी वेळ आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. वाघमारे गेल्या कित्येक वर्षापासून पाणी वाचवून वाढविण्यासंदर्भात आणि त्याचा फायदा संदर्भात जागृती करत आहेत. त्यांनी स्वतःची पद्धत तयार केली असून त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने पाणी वाचवता येते. घरी अपार्टमेंट उद्यान कार्यालये मंदिरातील पाणी सुद्धा वाचवू शकतो आणि परत आपल्या भागात नव्हे तर जगात याचा उपयोग करता येईल. असे त्यांनी सांगितले.
त्यांनी उद्योजक हर्षद कलघटगी यांना भेटून त्यांच्या टिळकवाडी येथील घरी ही व्यवस्था केली आहे. या संपूर्ण कामाचे सुपरव्हिजन करून जमिनीत पाणी जिरविण्याचे काम ते करत आहेत. छतावरुन जाणारे पावसाचे पाणी टाकीत टाकीत जमा करून तीन थरांच्या माध्यमातून स्वच्छ करून घेऊन शुद्ध करता येते किंवा इतर ठिकाणावरून जमलेले पाणी थेट विहिरी किंवा कूपनलिकेत मिसळणे पेक्षा सुरुवातीला एक फिल्टर तयार करून ते पाणी वापरले तर फार काळ उपयोगात आणता येते. पावसाचे पाणी घेऊन जमिनीतील पाणी वाढवणे फार महत्वाचे आहे यासाठी वाळूचा वापर करावा असे त्यांनी सुचवले आहे.