ए पी एम सी ते अलतगा रस्ता दुरुस्त करा या मागणीसाठी यमकनमर्डी भाजपने देखील पुढाकार घेतला असून कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन केले आहे .या रस्त्यासहित संपूर्ण रस्त्याचा विकास करावा तसेच रुंदीकरण करावे अशी मागणी करुन ग्रामस्थांनी भाजपने केली आहे
सोमवारी सकाळी कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीच्या पुलावर भाजप कार्यकारणी सदस्य , मारुती अष्टगी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जोरदार निदर्शने केली . रस्त्यात ठिय्या मांडून , रस्त्याचा विकास झालाच पाहिजे , न्याय द्या , न्याय द्या , अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या .
या अगोदर या रस्त्यासाठी जिल्हा पंचायत सदस्या आणि कंग्राळी खुर्द ग्रामस्थांनी आंदोलन केले होते.आज या कामासाठी भाजपने देखील पुढाकार घेतला आहे.सध्या कंग्राळी खुर्द नदी वरचा नदीवरील पूल कमकुवत झाला आहे . त्यावरून वाहतूक करणारे धोक्याचे आहे . बेळगावपासून सुमारे २५ गावांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे .पण ह्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे .
या रस्त्यावर अनेक खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे . या रस्त्यावर अनेकदा लहानमोठे अपघात होतात . सध्या पावसाळा असल्याने रस्त्याची परिस्थिती सांगण्यालायक राहिलेली नाही . यासंदर्भात अनेकदा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील काहीच उपयोग झाला नाही असा आरोप करण्यात आला.