वेगवेगळ्या 35 जातीच्या पक्षीमित्रांनी बेळगावच्या किल्ला तलावाला भेट दिल्यामुळे हा भाग एक छोटे पक्षी अभयारण्य म्हणून ओळखला जात आहे .यामुळे या ठिकाणी फोटोग्राफर आणि पक्षीप्रेमींची गर्दी होत आहे. किल्ला तलाव हे बेळगाव शहरातील एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहे. याठिकाणी पक्षांच्या वेगवेगळ्या जाती आकर्षित होतात.
किल्ला तलावात तयार करण्यात आलेले एक बेट या पक्षांसाठी निवारा घर झाला आहे. किंगफिशर व इतर अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी या ठिकाणी पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवत आहेत.या तलावाची काळजी सांभाळणाऱ्या दर्शन उद्योग समूहाने या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जातींना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले असून पक्षांना एक आपल्या घरा सारखे वातावरण तयार केले आहे .
काही करून पक्ष्यांना त्रास होऊ नये याची काळजी ते घेत आहेत किल्ला तलावातील बेटावर कोणालाही जाऊ देण्यात येत नाही. त्यामुळे पक्षी शांतपणे तेथे वास्तव्य करत आहेत.
पक्ष्यांच्या बद्दल अभ्यास करणारे किंवा पक्ष्यांच्या वेगवेगळ्या रूपातील जाती पाहण्यासाठी येणारे लोक किल्ला तलावाकडे आकर्षित होत आहेत. किल्ला तलावातील बोटिंग करताना या पक्ष्यांच्या जाती पाहायला मिळत आहेत. प्रत्येकानेच या पक्ष्यांना त्रास न देता त्यांना तेथे जगू देणे गरजेचे आहे याचे भान बाळगावे लागेल.