बेळगावची पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीत निवड होऊन देखील रँकिंगमध्ये 40 व्या क्रमांकवर घसरण झाल्या बद्दल नगरविकास मंत्री यु टी खादर यांनी नाराजी व्यक्त करत कामे लवकर पूर्ण करा अशी ताकीद अधिकाऱ्यांना दिली आहे. शुक्रवारी सकाळी अशोक नगर येथील जिम स्विमींग पूल आणि स्मार्ट सिटीच्या रस्त्यांची पहाणी केली त्या नंतर डी सी ऑफिस अधिकाऱ्यां सोबत आढावा बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे.
बैठकीत पालिका आयुक्त शशिधर कुरेर,डी सी डॉ एस बी बोमनहळळी आमदार अनिल बेनके अभय पाटील लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या कामातून सब काँट्रॅक्ट देण्याची पद्धत रद्द करा अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत अश्या तक्रारी आल्या आहेतअनेक रस्त्यांना भेगा पडलेत अश्या चुका होता कामा नये अश्या सूचना केल्या. स्मार्ट सिटीची कामे चालू असताना अभियंते कोलकाता आणि हैद्राबाद मध्ये असतात अशी तक्रार आमदार बेनके यांनी केली असता खादर सदर अभियंत्यांना कामे संपेपर्यंत बेळगावात ठाण मांडून राहिले पाहिजेत असा आदेश दिला. शहरातील बहुतेक गार्डन मधून पाणी आडवा पाणी जिरवा योजना अंमलात आणा अश्या सूचना देखील मंत्र्यांनी केल्या.
बेळगाव मधील या प्रोजेक्ट मध्ये अडीच हजार कोटींची कामे होणार अशी माहिती देत अधिकाऱ्यांनी तातडीने कामे पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत असे देखील सूचित केले.यावेळी डिजिटल बोर्ड बद्दल माहिती घेतली स्मार्ट सिटी योजनेतून निर्मिती होणाऱ्या हॉस्पिटल बद्दल माहिती जाणून घेऊन सूचना केल्या.