नगरविकास मंत्री यु टी खादर यांनी महापालिका आयुक्त शशिधर कुरेर यांना फटकारले आहे.गेली तीन वर्षांपूर्वी मास्टर प्लॅन मध्ये घर गमावलेल्या परिवारास अद्याप नुकसान भरपाई न दिल्याने पीडित कुटुंबाने थेट मंत्र्यांकडे तक्रार केली असता मंत्र्याने पालिका आयुक्त कुरेर यांची चांगलीच क्लास घेतली आहे.
शुक्रवारी दुपारी महापालिकेतील सभागृहात नगरविकास मंत्री यु टी खादर यांनी जनतेच्या तक्रारी स्वीकार केल्या त्यावेळी साक्षी शंकर हट्टीकर यांनी मास्टर प्लॅन मध्ये आपण बेघर झालो असून स्थानिक अधिकाऱ्यांनी अद्याप नुकसान भरपाई दिली नसल्याची तक्रार केली त्यावेळी नगरविकास मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गेली तीन वर्षापासून पालिकेचे उंबरठे झिजवले तरी न्याय मिळत नसल्याची तक्रार करत केली. रामलिंग खिंड गल्ली कार पार्किंग जवळील सी टी एस नंबर 1675/बी या जागेतील घराला नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार केली.
रस्ता रुंदीकरण किंवा मास्टर प्लॅन मध्ये बेघर झालेल्या किंवा जागा गेलेल्या गरिबांची नुकसान भरपाई असलेली आणखी प्रकरणे असतील तर त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या असा आदेश नगरविकास मंत्र्यांनी बजावला आहे.जिल्हाधिकारी यांनी अश्या प्रकरणात लक्ष घालावे अश्या सूचना देखील त्यांनी देत महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.