Friday, May 3, 2024

/

सरकारच्या पराभवाला बेळगाव जिल्हा कारणीभूत

 belgaum

नेते कुठल्याही पक्षातील असोत ते बेळगाव जिल्ह्यातील असले तर सरकार हादरवून सोडू शकतात हेच सध्या घडलेल्या राजकारणात दिसले आहे.काल घडलेल्या घडामोडीत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील निजद आणि काँग्रेस युती सरकारचा पराभव झाला.
विश्वास प्रस्तावाच्या विरोधात 105 तर समर्थनात 99 मते पडली त्यामुळे कर्नाटकात सुरू असलेले राजकीय महानाट्य 18 दिवसांनी संपले. त्यामुळेच भाजप नेते एडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होणार आहे .निजद आणि काँग्रेसची युती सरकारमध्ये मान मिळाला नाही या कारणास्तव बेळगाव जिल्ह्यातील पेटलेली ठिणगी या सरकारचा पराभव करणारी ठरली आहे .त्यामुळे एकूण घडामोडींमध्ये बेळगाव जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची आहे.

मागील वर्षीपासून पेटलेली आग सरकार भस्म करणारी ठरली. यंदा 1 जुलैपासून या नाट्याला सुरुवात झाली व काँग्रेसचे आमदार रमेश जारकीहोळी आणि विजयनगरचे काँग्रेसचे आमदार आनंद सिंग यांनी राजीनामा देऊन सरकारला धक्का दिला होता. आमदार आनंद सिंग यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्याकडे अपात्रतेसाठी तक्रार झाली. काँग्रेस आमदारांचे राजीनामे सरकारसाठी धोकादायक ठरले होते. बेळगाव पीएलडी बँक आणि मानाच्या मंत्रीपदावरून झालेले युद्ध आणि यातून सरकारला बसलेला धक्का त्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात आहे. कुमारस्वामी यांनी वेगवेगळे प्रयत्न करून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र असंतुष्ट आमदारांनी आम्ही आता कोणाचेच ऐकणार नाही असे स्पष्ट केल्यामुळे या सरकारला आपले अस्तित्व सिद्ध करता आले नाही .

आता काँग्रेसचे रमेश जारकीहोळी हे भाजपमध्ये आपली शक्ती आजमावणार असल्यामुळे आणि पालक मंत्री पदाचा अनुभव असल्यामुळे भाजप सरकार त्यांनाच पालकमंत्रीपद देणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात असून त्यासाठी तसेच मंत्रिपदाच्या किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रमेश यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबरीने बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे प्रभावी नेते म्हणून मानले जाणारे उमेश कत्ती यांनाही चांगले मंत्री पद मिळू शकते किंवा उमेश कत्ती कत्ती यांना पालकमंत्री करून रमेश यांना कॅबिनेट मध्ये समावेश केला जाणे शक्य आहे.

 belgaum

या दृष्टीने होणाऱ्या हालचालींकडे यापुढे जनतेचे लक्ष राहणार आहे. भाजप आपले संख्याबळ राज्यपालांकडे दाखवून सत्तास्थापनेचा यशस्वी प्रयत्न करणार आहे. संपूर्ण देशात प्रभाव नसताना युती करून असलेले सरकार कर्नाटकमध्ये भक्कम होते. मात्र आपल्याच आमदारांना संतुष्ट ठेवता न आल्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला असून कर्नाटका वरची सत्ता त्यांना घालवावी लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.