एक महिलेच्या आततायी पणामुळे महात्मा फुले रोडवर आज एक विचित्र अपघात घडला आहे. मालवाहू रिक्षा बाजूला घेण्याच्या नादात त्या महिलेने प्रवासी रिक्षाला ठोकरले असून सदर रिक्षा दुभाजक ओलांडून पलटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. सुदैवानेच प्राणहानी टळली असून काहीजण जखमी झाले आहेत.
एक मालवाहू रिक्षा स्वतः चालवायला जाऊन त्या महिलेने इतरांचा जीव धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला. मालवाहू रिक्षा बाजूला घेताना ती अचानक रस्त्याच्या मधोमध आणल्याने प्रवासी रिक्षा चालकाला काहीच खबरदारी घेता आली नाही आणि हा अपघात घडला.
अपघाताचे दृश्य एकाद्या चित्रपटातील सिन प्रमाणे होते.
पलटी खाऊन दुभाजकावरून गेलेली रिक्षा सरळ उभी राहिली यामुळे प्रत्यक्ष हा अपघात पाहणाऱ्यांना स्टंट पाहिल्याचाच अनुभव आला. पतीची रिक्षा स्वतः चालविण्याचा आततायीपणा असा दुसऱ्यांना अंगलट आला असून घटनेची जोरात चर्चा होत आहे.