बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरला लेफ्टनंट जनरल, परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल आणि सेना मेडल प्राप्त वरिष्ठ लष्करी अधिकारी अशोक आंब्रे यांनी भेट दिली. ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी त्यांचे स्वागत केले.
एनडीए चे विद्यार्थी आणि मराठा च्या जंगी पलटन या पहिल्या बटालियन मध्ये समाविष्ट असलेले आंब्रे हे वरिष्ठ अधिकारी आहेत. 7 जून 1980 मध्ये ही बटालियन स्थापन झाली होती.
आपल्या 39 वर्षांच्या लष्करी सेवेत त्यांनी भारत व विदेशात सेवा बजावताना अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. एनडीए खडकवासला चे डेप्युटी कमांडन्ट आणि चीफ instructor हे पद त्यांनी निभावले आहे.अनेक बहुमान त्यांनी मिळवले असून 2010 मध्ये सेना मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
आपल्या भेटीत त्यांनी मराठा वार मेमोरियल ला भेट देऊन शहिद जवानांना अभिवादन केले. शौर्य गाथा, मराठा म्युजियम येथेही त्यांनी भेट दिली. जवान व अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.