कोल्हापूर बंगळुरू दरम्यान दररोज धावणारी बेळगाव हुन बंगळुरूला जोडण्यात मोलाची भूमिका बजावनारी राणी चन्नम्मा एक्सप्रेस या रेल्वेला नवीन रूप देऊन रंग रंगोटी करण्यात आली आहे.
प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळण्यासाठी राणी चनम्मा एक्सप्रेसला उत्कृष्ट कोच देण्यात आले आहेत. आता रंगीत आणि आरामदायी प्रकारचा प्रवास प्रवाशांना मिळणार आहे.
चांगल्या प्रकारची रंगसंगती वापरून हे कोच सजवण्यात आले आहेत. एल ई डी लाईट आणि बिना दुर्गंधीचे टॉयलेट्स हे वैशिष्ट्य असेल. स्वच्छ रेल टॉयलेट्स चा उपयोग करण्यात आला आहे तसेच सर्व ठिकाणी उत्कृष्ट साहित्याचा वापर करून कमीत कमी पाण्याचा वापर करून वापरण्याची सोय आहे.