धारवाड उच्च न्यायालयात आज शुक्रवारी झालेल्या सुनावणी नंतर महापालिका निवडणुकीचा फैसला या जून महिन्याच्या समाप्तीला होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बेळगाव मनपाचे आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचना चुकीची असल्याची याचिका धनराज गवळी यांच्या नेतृत्वात काही माजी नगरसेवकांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली त्यात 28 जून रोजी या याचिकेवर निर्णय देण्यात येणार आहे.
शुक्रवारी उच्च न्यायालयात अडिशनल अडव्होकेट जनरल दिनेश राव आले होते त्यांनी बंगळुरू आरक्षण विरोधी याचिकेची प्रत हजर केली त्या नंतर 28 रोजी निर्णय दिला जाणार आहे अशी माहिती धनराज गवळी यांनी बेळगाव live कडे दिली .
28 रोजी निवडणूक आयोग आणि सरकार आपली बाजू कोर्टात मांडणार असून त्या दिवशी या विषयावर संपूर्ण सुनावणी होऊन निकाल दिला जाणार आहे.आता या याचिकेवरील निर्णय येताच महा पालिका निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्या नंतरच निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे.