वर्दीतील ऑटो रिक्षा पलटी होऊन पाच विद्यार्थी जखमी झाल्याची मंगळवारी सकाळी ताजी असतानाच प्रमाणापेक्षा अधिक शालेय विद्यार्थी वाहून नेणाऱ्या ऑटो चालकांवर रहदारी पोलिसांनी केली आहे.दहा पेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणाऱ्या 60 ऑटो चालकां कडून दंड वसूल करण्यात आला आहे.
बेळगाव उत्तर रहदारी पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी या वर्दीत गर्दी करणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई केली आहे. केवळ ऑटो चालकवर दंड करून न थांबता ऑटोत 10 पेक्षा अधिक असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पोलीस जीप मधून शाळे पर्यंत ड्रॉप देत नवीन पोलिसिंग राबवली आहे
गेल्या कित्येक वर्षा पासून वर्दीतीले ऑटो लहानग्या कोंबून घेऊन जात असतात अनेकदा पोलिसांनी मोहीम राबवली तरी देखील याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.शाळा प्रशासनाने देखील यात पुढाकार घेऊन वर्दीत एका रिक्षात केवळ दहाच विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी अशीही मागणी केली जात आहे.